– २५ हजारांची स्वीकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली : निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एरिअस ची रक्कम काढून देण्याकरिता ३० हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून ताडजोडीअंती २५ हजारांची लाच स्वीकारतांना चामोर्शी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील महिला कनिष्ठ सहायक श्रीमती वनिता प्रभाकर तावाडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईचे नावे सातव्या वेतन आयोगानुसार कुटुंब निवृत्ती वेतनाचे वेरियस ची रक्कम काढून देण्याच्या कामाकरिता पंचायत समिती चामोर्शी येथील कनिष्ठ सहाय्यक श्रीमती वनिता प्रभाकर ता वाडी यांनी 30 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली गवताळ जोड्यांची 25 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना पंचायत समिती चामोर्शी च्या मुख्य द्वारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्याची कारवाई आज 22 एप्रिल रोजी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाणे चामोशी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये श्रीमती वनिता प्रभाकर गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपधीक्षक सुरेंद्र गरड, श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, श्रीनिवास संगोजी, मपोशी विद्या म्हषाखेत्री, मपोशी ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळषिराम नवघरे सर्व ला.प्र.वि गडचिरोली यांनी केली.