चामोर्शी येथे तेली समाजाने आमदार डॉ.होळी यांच्या फोटोचा बॅनर जाळून केला निषेध

2205

– आमदार होळी यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : चामोर्शी शहरातील भाजपा चे नगरसेवक आशिष पिपरे यांना शिवीगाळ केली तसेच गणपतीची वर्गणी मागण्यास गेलेल्या तेली समाजाच्या युवकांचा अपमान केल्याच्या निषधार्थ चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या फोटोचा बॅनर जाळून तेली समाजातर्फे काल गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर निषेध करण्यात आला. तसेच आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणीही करून करण्यात आली.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जय बजरंग गणेश मंडळ चामोर्शीच्या वतीने आमदार डॉ. होळी यांना वर्गणी मागायला गेले असता आमदार होळी यांनी तुम्ही तेली समाजाच्या नावाने दादागिरी करता काय, तुम्ही दारू बंदीचे समर्थन करता, दारूबंदीचे समर्थन करून तुम्हाला दारू विकायची आहे काय असे प्रत्युत्तर दिले व निखील देवाजी धोडरे या युवकाचा अपमान केला तसेच नगरसेवक आशिष पिपरे यांना शिविगाळ केली हे तेली समाजाच्या नगरसेवकाचा व युवकांचा अपमान नसून समस्त तेली समाजाचा अपमान आहे. या प्रकरणी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या फोटोचा बॅनर जाळून तेली समाजातर्फे गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी निषेध करण्यात आला व आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणीही करून करण्यात आली.

आमदार डॉ. होळी यांना ९० टक्के तेली समाजाचे मतदान आहे. आमदार असल्याने गणेश मंडळातर्फे ५ हजार रुपयांच्या वर्गणीची मागणी करण्यात आली यावेळी आमदार डॉ. होळी यांनी १ हजार रुपयांची वर्गणी दिली. नगरसेवक म्हणून मी गणेश मंडळाने मागणी केलेल्या वर्गणीबाबत आमदार होळी यांच्याशी बोललो असता त्यांनी सभ्यतेच्या भाषेत बोलणे अपेक्षित होते मात्र तसे न होता असभ्य बोलत ‘बे’ या शब्दात शिवीगाळ केली व मला दारूबंदीचे समर्थन करून तुम्हाला दारु विकायची आहे काय अशा शब्दात बोलले. तेली समाजाच्या वतीने उद्रेक पाहावयास मिळत असून कोणत्या कारणाने मला आमदार डॉ. होळी यांनी ‘बे’ या शब्दात शिवीगाळ केली याबाबत स्वतः खुलासा करणार आहे.
– आशिष पिपरे
नगरसेवक चामोर्शी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here