– स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई, पाच आरोपी ताब्यात
The गडविश्व
वर्धा : चारचाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करतांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा कारवाई करून चारचाकी वाहनासह ५ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बादल दिवाकर धवने (२८), गौरव संजय जबळे (२१) दोन्ही रा. इंदिरानगर वर्धा, सतीश गणपतराव हजारे (३३) गणेशपेठ नागपूर, स्वप्नील उमेश दूरगडे (२२) रा.चांदुरबाजार अमरावती ह.मु.सावंगी (असोला) नागपूर, यश किशोर तिवारी (२५) रा.गणेशपेठ नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक वर्धा जिल्ह्यात होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता इंदिरानगर वर्धा येते योजनाबद्ध सापळा रचून पोलीस दबा धरून बसले, दरम्यान एक मारुती सुझुकी कंपनीची वाहन आले व लगेच एक ऍक्टिवा दुचाकी गादीवर असलेले दोन इसम कार जवळ येऊन कार मधील दारूचा मुद्देमाल ऍक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असता पोलिसांनी घेराव घालत दोन्ही वाहनांना शिताफीने ताब्यात घेऊन आरोपींच्या ताब्यातून विदेशी दारुसह, ऍक्टिवा दुचाकी व चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीना ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे सपोनि महेंद्र इंगळे, पोउपनि अमोल लगड, पोउपनि लालपालवाले, पोलीस अंमलदार निरंजन वरभे, हमीद शेख, रणजित काकडे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, दीपक जाधव, अभिजित वाघमारे, प्रदीप वाघ, अमोल ढोबाळे, मनीष कांबळे, अनुप कांबळे, गणेश खेवले यांनी केली.