– सावली तालुक्यात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग
The गडविश्व
ता. प्र / सावली : तालुक्यात आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील साखरी येथील मारोती भोयर यांच्या घरात आज सकाळपासून आलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे. यात अन्नधान्य व इतर साहित्यांचे नुकसान झाले.
जुलै महिना लागताच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिकडे तिकडे पाण्याचे साम्राज्य दिसत आहे तर चार-पाचदा नदी नाल्याला पूर येत आहे. आज २३ जुलै रोजी सकाळी ४ वाजतापासून साखरी येथे पावसाने दमदार बॅटिंग केली. दरम्यान जंगल परिसरात पडलेल्या पाण्याची दिशा ही घराकडे वळल्याने मारोती भोयर यांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे. मातीचे घर असल्यामुळे घर पडण्याच्या भीतीने त्यांनी आपली वस्ती गावातील धर्मशाळेत आसरा घेतला आहे. तर या सततदार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले, तलाव तुडुंब भरून आहेत तर अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या वस्त्या स्थलांतर कराव्या लागल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने मारोती भोयर यांचे अन्यधान्य तसेच इतर साहित्यांचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.