चार वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद : गावाने साजरा केला उत्सव

234

The गडविश्व
गडचिरोली, २ एप्रिल : सिरोंचा तालुक्यातील तमंदला येथील गाव संघटनेने अवैध दारूविक्री विरोधात लढा देऊन गावाला दारूमुक्त केले आहे. या यशाचा विजयोत्सव साजरा करीत गावात विजयस्तंभ उभारून इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पूर्वी या गावात घरगुती दारू काढण्यासह अवैध दारूविक्री सुद्धा केली जात होते. नजीकच्या आदिमुत्तापूर व मुत्तापूर येथीलही विक्रेते या गावात दारू आणून विक्री करीत असायचे. अशातच मुक्तिपथ अभियानाने गावात बैठक घेऊन महिलांची एक संघटना स्थापन केली व वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनतर दारूविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. सोबतच अवैध दारूविक्री बंद करण्याचा ग्रामसभेने देखील ठराव पारित केला. वेळोवेळी गाव संघटनेकडून दारूविक्री बाबतचा पाठपुरावा सुरूच होता. गावातील दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांसाठी मुक्तिपथने व्यसन उपचाराची सोय करून दिली. सोबतच विविध उपक्रम राबवून दारूबंदीशिवाय गावाचा विकास अशक्य असल्याची बाब ग्रामस्थांना पटवून दिली. तेव्हापासून आता चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून गावात दारूविक्री बंद आहे. या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गावात विजयस्तंभ उभारून ग्रापं सदस्याच्या हस्ते उदघाटन करण्यात आला. यावेळी आमचे गाव दारूविक्रीमुक्त गाव अशा घोषणाही देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, ग्रापं सदस्य, शाळा मुख्याध्यापक, गावातील महिला, पुरुष, युवक-युवती, मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here