चिंगलि येथे भव्य रबरी बाँल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

221

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ नोव्हेंबर : तालुक्यातील चिंगलि येथे भव्य रबरी बाँल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले.
चिंगलि येथिल नवयुवक क्रिकेट क्लब यांच्या वतिने कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुर्हतावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव डाँ.नामदेव किरसान, प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर पा.पोरेटी माजी जि.प.उपाध्यक्ष, परसराम पदा तालुका अध्यक्ष, विनोद लेनगुरे माजी जि.प.सदस्य , तनुजाताई तुलावि सरपंच चिंगलि, रजनिकान्त मोटघरे अध्यक्ष अनुसुचित जाति विभाग, सुंदरशहा तुलावि उपसरपंच, रुपेश टिकले परिवहन सेल जिल्हाध्यक्ष, अनिल कोठारे काँग्रेस उपाध्यक्ष, लालाजि सातपुते, रमेश बोरकुटे ग्राम पंचायत सचिव, रुषिजी गुरुनुले ग्रा.प.सदस्य , वासुदेव चौधरी, मनोहर उईके, देवराव ताडाम, नानाजी चौधरी आदि मान्यवर व गावकरी, खेडाडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here