चिमुर : वाघाच्या हल्ल्यात गोरा जखमी, मानेमोहाळी शेतशिवारातील घटना

343

– मानेमोहाळी शेतशिवारातील घटना
The गडविश्व
चिमुर : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मानेमोहाळी शेतशिवारात वाघाने हल्ला करून गोऱ्यास जखमी केल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मनोहर रामटेके रा. मानेमोहाळी यांच्या मालकीचे हा गोरा आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनोहर रामटेके हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात बैल घेवून गेले. काही बैलांना इतर ठिकाणी बांधण्यास नेले व गोऱ्याला नजीकच झाडाला बांधून ठेवले असता दबा धरून असलेल्या वाघाने गोऱ्यावर हल्ला चढवला. यावेळी नजीकच असलेल्या मनोहर रामटेके व इतर सहकाऱ्यांनी आरडाओरड केली असता वाघाने धुम ठोकली व पळून गेला. मात्र या हल्ल्यात गोर जखमी झाला असून मानेवर जखम झाली आहे. सदर घटनेची माहीती वनाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. बातमी लिहेस्तव वनाधिकारी घटनास्थही दाखल व्हायचे होते.
परिसात अनेक दिवसांपासून वाघाचा वावर आहे. परिसरात काही दिवसांअगोदर वाघाने बैलाची शिकार केली होती. अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. शेतशिवारात वाघ असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात याव अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here