– विद्यार्थ्यांना संपूर्ण मतदान प्रक्रियेसंदर्भात दिली माहिती
The गडविश्व
नेरी, ५ ऑगस्ट : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाहीची जाणीव निर्माण व्हावी व आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण, कार्यतत्पर, सशक्त नागरिक घडावे ही जाणीव ठेवून चिमूर तालुक्यातील जनता विद्यालय नेरी येथे प्राचार्य येरने यांच्या मार्गदर्शनात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशापद्धतीने पार पाडली जाते त्याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घडवून आणला. विद्यार्थ्यांना निवडणुक प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून निवडणूक प्रत्यक्ष ballet unit व control unit मोबाइलद्वारे app तयार करून घेण्यात आली.
याप्रसंगी शालेय निवडणूक आयुक्त म्हणून शिक्षक माधव पिसे, उपायुक्त म्हणून बमनोटे मॅडम, निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक गराटे, तथा सर्व वर्ग शिक्षक, शिक्षिका यांनी काम पाहिले. तसेच शिक्षक वर्धलवार यांनी निवडणुक झोनल अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच केंद्राध्यक्ष म्हणून शिक्षक पडोळे व मतदान अधिकारी म्हणून शिक्षक वैभव चौधर , शिक्षक संदेश पंधरे , शिक्षक बोदेले, शिक्षक बांबोळे व शिक्षक प्रमोद पिसे यांनी उत्कृष्ट कार्य केले.
या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून वर्ग ९ वी चा लंकेश जिवतोडे तर उप मुख्यमंत्री म्हणून कु विद्या कामडी निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी पदाची शपथ घेतली. तर मंत्रमंडळात शालेय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, क्रीडा मंत्री इत्यादी मंत्र्यांची निवड करून मंत्री मंडळाची स्थापना केली. यावेळी प्राचार्य येरने यांनी सर्व शालेय मंत्रिमंडळाला शपथ दिली. शिक्षक के.प्र. महल्ले व शा. व्य. समिती अध्यक्ष रमेश बोलधने यांनी नवनियुक्त शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्व मंत्री यांना पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संपूर्ण प्रक्रियेचे संचालन शिक्षक माधव पिसे यांनी , आभार.शिक्षिका कु.जिवतोडे यांनी मानले.