– पोलीस निरीक्षक मनोज गभने यांची माहिती
The गडविश्व
चिमूर (Chimur), २९ सप्टेंबर : शहरात व परिसरात कालपासून मुले पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याबाबतच्या केवळ अफवा असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चिमुरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी दिली आहे.
कालपासून सोशल मिडियावर चिमूर व परिसरामध्ये मुले पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याबाबत तसेच एका मुलीच्या आपबीतीच्या कथनचा व्हिडिओ वायरल केल्या जात आहे. या घटने संबधाने बारकाईने चौकशी करण्यात आली असता तशी वस्तुस्थिती दिसून आली नाही. धार्मिक कार्यक्रमाची माहूर साठी निघणारी पालखी याकरिता काही महिला व मुले हे लोकांना पावती देऊन वर्गणी मागत असल्याचे दिसून आल्याने सदर महिलांना बोलावण्यात येऊन त्यांची शहानिशा केली असता त्यांची गुन्हेगारी किंवा संशयी पार्श्वभूमी दिसून आली नाही याचे महिला संबधात काही लोकांनी खोट्या अफवा पसरविल्या आहेत. तरी जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व भितीदायक व जनतेमध्ये दहशत पसरेल असे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे असे आवाहन चिमुरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी केले आहे.