– तंमुस च्या मदतीने अडकले विवाह बंधनात
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील चोप येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने नुकताच आज ९ मे रोजी प्रेमीयुगलांचा विवाह लावून दिला. यावेळी विवाहाचे प्रमाणपत्रही नव दाम्पत्यांना देण्यात आले.
फुलचंद आसाराम कुमरे रा.चोप पो. कोरेगाव ता. देसाईगंज जि. गडचिरोली याचे कुस्मीता नानाजी उसेंडी मु. कन्हाळगाव पो. मोहली ता.धानोरा जि. गडचिरोली हिच्याची प्रेम होते. दोघांचाही विवाह करण्याचा विचार होता. वर मुलगा फुलचंद आसाराम कुमरे यांने तंटामुक्त समिती चोप येथे विवाहाकरिता रितसर अर्ज केला असता आज ९ मे रोजी सकाळी ११ वाजता तंटामुक्त समितीने ग्रापंचायत सभागृहात विवाह लावून दिला.
यावेळी सरपंच नितीन लाडे, उपसरपंच प्रकाश डोंगरवार, लिलेश्वर पर्वते तंटामुक्त अध्यक्ष, मदन बनपूरकर, शुभम नागपूरकर, गोविंद ठाकरे, शिवाजी ठाकरे व गावकरी उपस्थित होते
नवदाम्पत्याना शुभाशीर्वाद देऊन वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.