– आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेक सुपूर्द
The गडविश्व
देसाईगंज, १४ ऑक्टोबर : देसाईगंज तालुक्यातील चोप येथील युवक ३ मे २०२२ रोजी उसेगावच्या जंगल परिसरात अजित सोमेश्वर नाकाडे वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्याच्या पश्चात शासनाकडून देय आर्थिक मदत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वडसा वन विभागाच्या वतीने ५ लाख रुपयाचा चेक कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी वडसा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, सिटी-१ वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात मौलिक भुमिका बजावणारे डाॅ.खोब्रागडे, शूटर मराठे, क्षेत्र सहायक विजय कंकलवार, सरपंच नितीन लाडे, गौरव नागपूरकर, सोमेश्वर नाकाडे, अशोक नाकाडे, त्रेम्बक भजने, शुभम नागपूरकर, शेखर कुथे , वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे आदी गावकरी उपस्थित होते.