– चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, २६ सप्टेंबर : तालुक्यातील व चातगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत बोथेडा व मुरुमबोडी जंगलपरिसरात हातभट्टी लावून मोहफुलाची दारू गाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुक्तिपथचे गडचिरोली तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
बोथेडा व मुरूमबोडी जंगलपरिसरात मोहफुलाचा सडवा टाकून दारू गाळली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. दारू काढण्यासाठी सडव्यामध्ये विषारी औषधींचा वापर केल्यास जंगली प्राणी दगावण्याची भीती आहे. त्यामुळे जंगलपरिसरात हातभट्टी लावून दारू गाळणाऱ्याचे साहित्य, सडवा नष्ट करून कारवाई करावी, अशी मागणी रेवनाथ मेश्राम यांनी निवेदनातून केली आहे.