The गडविश्व
गडचिरोली : सन 1947 साली तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कै.बाळासाहेब खेर यांनी जंगल मक्तेदाराकडून आदिवासी समाजाची होणारी पिळवणुक व शोषण थांबावे,त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, आदिवासी समाजातून नेतृत्व निर्माण होवून या समाजाला मानवतेची वागणूक मिळावी व त्यांचे करवी समाजाच्या उध्दाराचे कार्य व्हावे,या करीता शासनाने धोरणात्मक दृष्टीकोणातून जंगल कामगार सहकारी संस्था चळवळीचा स्विकार केला आहे.सद्यास्थितीत गडचिरोली जिल्हयात 26 संस्था कार्यरत आहेत.या संस्थांना वनविभागाचे कार्य आयोजनेत समाविष्ट असलेली कुपे तोडीस वाटप करण्यात येतात. त्यापासून संस्थांचे सभासदांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होते.
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत वनविभाग गडचिरोली या वनविभागात मंजुर कार्य आयोजनेनुसार तोडीस योग्य असलेली कुपे अनुक्रमे एकुण 6 कुपे जंगल कामगार सहकारी संस्था यांना त्यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत येत असलेली कुपे वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली डॉ. किशोर एस. मानकर, यांचे हस्ते वाटप करण्यात आली. त्यातून 741.892 घ.मी. ईमारती लाकूड अपेक्षित आहे. तसेच त्यापासुन 2.00 कोटी चा महसुल अपेक्षित आहे.
जंगल कामगार सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटपाबाबत दिनांक 23.03.2022 व 30.03.2022 रोजी वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली यांचे कार्यालयात व्हि.सी. द्वारे सभा घेण्यात आली.सभेचे अध्यक्षस्थानी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) पी.कल्याणकुमार,नागपूर हे होते.सभेस वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली,डॉ.किशोर एस.मानकर, उपवनसंरक्षक गडचिरोली, मिलेश दत्त शर्मा,अध्यक्ष जिल्हा संघ हिरामण वरखडे,पि.के. झाडे सचिव जिल्हा संघ व जंगल कामगार सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव हजर होते.
जंगल कामगार सहकारी संस्था यांनी सन 2021-22 वर्षाकरीता मागणी केल्यानुसार जिल्हा संघ जंकास,जिल्हा उपनिबंधक, उपवनसंरक्षक व वनसंरक्षक (प्रा.) यांनी शिफारस केल्याप्रमाणे शिफारशीस अधिन राहून सिरोंचा व गडचिरोली वनविभागातील तोडीस उपलब्ध कुपे जंगल कामगार सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे कुप वाटप अहवालाचे वाचन करुन त्यांचे नावे सदर कुपाचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सिंरोचा व गडचिरोली वनविभागाअंतर्गत कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील मिळून एकूण 31 व कुपाचे 2 भाग कुपाचे संस्थांना वाटप करण्यात आले. त्यापासुन 5719.64 घ.मी. ईमारती लाकुड उत्पादनाचे उद्दीष्ट असुन त्यापासून 13.21 कोटी महसूल अपेक्षित आहे. प्राप्त महसुलातून खर्च वजा जाता शिल्लक निव्वळ महसुलातून 20 टक्के वाटा हा जंगल कामगार सहकारी संस्थांना मिळतो. त्यापैकी 10 टक्के वाटा संस्थांचे सभासदांना कल्याणकारी कामासाठी वाटप करण्यात येतो. कुपात निष्कासनाची कामे करणेसाठी सभासदांना रोजगार सुध्दा उपलब्ध होणार आहे.