– घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
– ५ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
दंतेवाडा,२६ जुलै : जिल्ह्यातील काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरामेटाच्या जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक उडाली यात जवानांनी एका नक्षलींचा खात्मा केला आहे. बुधराम मरकम असे ठार झालेल्या नक्षलीचे नाव आहे. ठार झालेल्या नक्षलीवर शासनातर्फे ५ लाखांचे बक्षीस जाहीर होते.
प्राप्त माहितीनुसार, दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण भागात गणवेशधारी नक्षली असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता सोमवारी रात्री दंतेवाडाचे डीआरजी जवान शोधासाठी निघाले. या दरम्यान जवान जबरामेटाच्या जंगलात पोहचताच आधीच घात लावून असलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यावेळी जवानांचा वाढत दबाव पाहता नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोध घेतला नक्षली बुधराम मरकम चा मृतदेह आढळून आला. यावेळी जवानांनी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्यही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दंतेवाडा एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले की, जवान अजूनही घटनास्थळी उपस्थित असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ठार झालेला नक्षली काटेकल्याण क्षेत्र समितीमध्ये सक्रिय होता, त्याचा अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभाग होता तसेच दंतेवाडा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.