The गडविश्व
नागपूर : जिल्ह्यातील चोर बावली परिसरात वाघाने दोन जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये पती-पत्नी दोघंही जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार हल्ला करणारा वाघ जखमी अवस्थेत होता. पती-पत्नी लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आहे.
जखमी वाघाच्या हल्ल्यात महिलेच्या पायाला तर तिच्या पतीच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यात दोघे बचावले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
घटनेबाबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्वरित ॲक्शन घेत सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण केले. वाघ रस्त्याच्याकडेला वीस ते पंचवीस फूट जंगलात शिरला होता. वन अधिकाऱ्यांनी त्या वाघाला तिथेच बेशुद्ध करून रेस्क्यू केले.