The गडविश्व
चिमूर, ८ जुलै : नवोदय विद्यालय समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२२-२३ चा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी ता.चिमूर येथील विद्यार्थिनी इयत्ता पाचव्या वर्गात शिक्षण घेणारी कु. प्रणाली जगदीश झोडे हिने सुयश प्राप्त केले असून तिची नवोदय विद्यालय, तळोधी (बा) येथे निवड झाली आहे.
दरवर्षी नवोदय विद्यालय समितीद्वारे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो.
कु. प्रणाली जगदीश झोडे हिने या प्रवेश परीक्षेत यश प्राप्त केले आहे. तिच्या या निवडीबद्ल जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून इतरही स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रणालीने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, शिक्षक वृंदाना दिले आहे.