The गडविश्व
ता.प्र /धानोरा, ६ नोव्हेंबर : तालुक्यातील जांभळी गट ग्रामपंचायत येथे ४ नोव्हेंबर रोजी नवीन शाळा इमारतीचे बाधकामाचे भूमिपूजन माजी जि.प.अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते पार पडले.
येथील शाळेला इमारतीची गरज होती. हीच गरज लक्षात घेवून शाळेला इमारत मंजुर करण्यात आली. सदर इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी माजी जि. प. सदस्य राजीव भाऊ जीवनी, माजी जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, सरपंच विलास कुंबरे, उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, ग्रा.पं.सदस्य प्रदीप शेंडे, ग्रा.पं.सदस्या शोभा पदा, ग्रा.पं.सदस्य सुनील मेश्राम, पंकज दरवडे, माजी उपसरपंच रमेश मेश्राम, सचिव गंजेवार, भूपेंद्र रोजगार सेवक, लोमेश चांभारे कम्प्युटर ऑपरेटर सुधाकर बावणे, अर्पणा गेडाम मोबलाइजर नीता व शेंडे व सेविका प्रवीण नरोटे कार्यकर्ता व इतर मान्यवर उपस्थितीत होते.