जागतिक आदिवासी दिनानिमित्त ए.जे.फाउंडेशनचा संकल्प

559

– जागतिक आदिवासी दिन साजरा
The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ए.जे.फाउंडेशन गडचिरोलीच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात केले व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
ए.जे.फाउंडेशनच्या भविष्यातील वाटचालीची रुपरेषा ए.जे.फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.आर.केदार यांनी यावेळी समजावून सांगितली. फाउंडेशनचे सादरीकरण उपाध्यक्ष विक्रम दडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. मनोज नन्नावरे यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची यादी सादर करून त्यावर चर्चा घडवून आणली. ईश्वर चौधरी यांनी आदिवासी मुलांच्या शैक्षणिक समस्या व त्यावर केले जाणारे प्राथमिक उपाययोजना यावर चर्चा घडवून आणली तसेच आदिवासी विद्यार्थी आणि युवकांना आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणकोणते उपक्रम हातात घेता येईल याविषयी विचार विनिमय करण्यात आले.
फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमास सहभागी होण्याचे आवाहन पुरुषोत्तम नन्नावरे, मोहन दोडके, धनराज नन्नावरे, ललित जांभुळे,शरद दोहतळे,सचिन भरडे, लिमेश जांभुळे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एम.राजनहिरे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण धाडसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here