The गडविश्व
गडचिरोली : संयुक्त राष्ट्राने 1972 पासुन 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे जाहीर केले तेव्हापासुन दरवर्शी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. जागतिक पर्यावरण दिन हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरू झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरूकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावारण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवषी वेगवेगळया कार्यक्रमाचं आयोजन केले जाते.
त्या अनुशंगाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रमानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली यु.बी.शुक्ल यांचे निर्देषानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रभारी सचिव तथा दिवाणी न्यायाधिष (व.स्तर) गडचिरोली आर.आर.पाटील यांचे मार्गदर्शनात आज 08 जून 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली कार्यालयाचे परिसरात वृक्षरोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली यु.बी.शुक्ल, जिल्हा अधिवक्ता संघ अध्यक्ष
गडचिरोली रविंद्र दोनाडकर, जिल्हा न्यायाधिष-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिष, गडचिरोली यु.एम.मुधोळकर, तदर्थ जिल्हा न्यायाधिष-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिष, गडचिरोली ए.एस.पंढरीकर, मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली एम.आर.वाषिमकर , व्दितीय सहदिवाणी न्यायाधिष (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली आर.आर.खामतकर, सह दिवाणी न्यायाधिष(क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एन.सी.सोरते, तसेच प्रबंधक जिल्हा न्यायालय गडचिरोली सौ. ए.एस.घरोटे आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली यु.बी.शुक्ल यांनी जागतिक पर्यावरण दिनाबाबत मार्गदर्शन करतांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे असे कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथील कर्मचारी अधिक्षक जी.एस.सुखदेवे, वरिश्ठ लिपीक एस.टी.सहारे आणि अक्षय ठाकरे, शंकर आळे, सुनिल चुधरी, कनिष्ठ लिपीक, संतोश वासेकर, नितीन के. जाधव, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले.