जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर जिल्हा समन्वयक व अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज आमंत्रित

254

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) , १२ सप्टेंबर : समाजातील अनिष्ट,अघोरी,अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे.या कायद्याच्या जनजागृती – प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या जिल्हास्तरीय समितीवर गडचिरोली जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची तसेच जिल्हा समन्वयक यांची नेमणूक करावयाची आहे.यासाठी जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.
संस्कारातून रूजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरूष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ,शोषण व त्यांचे जीव वाचणार आहेत. समाजात प्रबोधन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय २८ जुन २०२२ अन्वये पुनर्रचना करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय समितीवर जिल्हा समन्वयक व सात अशासकीय सदस्यांचा नव्याने समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.
अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी सहायक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,एल.आय.सी. ऑफिस रोड,आयटीआय चौक गडचिरोली 442605 या पत्त्यावर किंवा 07132-222192, sdswog@gmail.com या मेलवर संपर्क साधावा.असे सहायक आयुक्त समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here