The गडविश्व
सावली : तालुक्यातील जिबगाव येथे बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.
पंचशील बुद्ध विहार बहुउदेशिय संस्था जिबगाव च्या वतीने सदर कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून घेण्यात आला.
वंदनीय भदंत भिक्खूसंघ वन्स अस्थविर मूल( टेकळी) यांचे मार्गदर्शनाखाली बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केले तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ऍड. राम मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, दिनेश पाटील चितनूरवार, माजी बांधकाम सभापती, नितीन गोहणे तालुका काँग्रेस अध्यक्ष, प्रभाकर भोयर मूल, राकेश गड्डामवार माजी सभापती, विजय कोरेवार माजी सभापती पंचायत समिती सावली, सरपंच पुरुषोत्तम चुदरी , उपसपंच ईदिरा भोयर, राकेश गोलेपल्लीवार, दिक्षा भोयर, लिलाबाई भोयर, मोनिका उडिरवाडे, छत्रपती गेडाम सावली, उसेगाव चे सरपंच चक्रधर दुधे, उसेगाव चे लोकप्रिय उपसरपंच सुनील पाल, साखरीचे सरपंच ईश्वर गेडाम, किशोर उंदिरवाडे, पार्वती रामटेके मॅडम, रुपचंद उंदिरवाडे, गोपाल रायपुरे, टी एस चव्हाण तलाठी जीबगाव, संदीप भोयर अध्यक्ष तंटामुक्ती समिती, त मु उपाअध्यक्ष राकेश देशमुख,इत्यादी मान्यवर व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते
तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मते यादरम्यान मान्यवरांनी व्यक्त केली. तथागत गौतम बुद्ध यांनी पंचशील तत्वे संगीतली त्या तत्वाचा उपयोग मानवी जीवन जगत असतांना केला पाहिजे असा मान्यवरांच्या भाषणाचा एकंदर सूर होता. तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या अहिंसा मार्गाचा अवलंब आज जगात आवश्यक आहे युद्ध नको शांती हवी असेही मान्यवरांनी याप्रसंगी स्पष्ट केल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील जनतेनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक युवराज बारसागडे यांनी केले याप्रसंगी बहुसंख्य जनता उपस्थित होती.