– उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करून दारूविक्रीचा व्यवसाय बंद करावा,अशी मागणी जिमलगट्टा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिमलगट्टा येथे मोहफुलाची, देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री केली जात आहे.या अवैध दारूविक्रीमुळे परिसरातील महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. घरातील कर्ता दारूच्या आहारी गेल्यामुळे घरगुती भांडणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. युवा मुलांना दारूचे व्यसन लागत आहे. त्यामुळे गावातील दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करून दारूमुक्त गाव व परिसर निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.