जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विहीरींव्दारे सिंचनाची सोय

326

The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स़वी वर्षामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ९१३ सिंचन विहीरींना मंजूरी देवून त्यापैकी ६१५ सिंचन विहीरींची कामे पूर्ण झाली आहेत. यातून जिल्हयातील किमान ६१५ एकर क्षेत्राकरीता शेतक-यांना पीकाच्या संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजना शेतक-यांसाठीची राज्य़ शासनाची जिल्हा परिषदांमार्फत राबवली जाणारी अंत्यंत महत्वाची योजना असुन यामध्ये अनुक्रमे अनु.जमातीच्या व अनु.जातीच्या १.५० लाख पेक्षा कमी उत्पन्ऩ असणा-या पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहीर २.५० लाख रू. मर्यादेत, जूनी विहीर दुरुस्ती ५० हजार मर्यादेत, इनवेल बोअर २० हजार मर्यादेत, पंपसंच २० हजार मर्यादेत, वीज जोडणी आकार १० हजार मर्यादेत, शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण १.०० लाख मर्यादेत, पाईप ३० हजार मर्यादेत, ठिबक सिंचन ५० हजार मर्यादेत, तुषार सिंचन २५ हजार मर्यादेत या प्रमाणे पॅकेज स्वरुपात विविध घटाकांचा लाभ दिला जोतो.
सन २०२१-२२ या वर्षात गडचिरोली जिल्हयातील १९३९४ शेतकऱ्यांनी शासनाच्या महा डिबीटी या पोर्टल वर ऑनलाईन अर्ज केला त्यापैकी सिंचन विहीरीकरीताचे ७१८५ अर्ज आहेत व उर्वरीत अर्ज इतर घटकांचे आहेत त्यापैकी लॉटरीमध्ये २२७३ शेतकऱ्यांची सिंचन विहीर घटक साठी निवड केली असुन त्यापैकी १०७७ शेतकरी पात्र ठरले असुन ९१३ शेतकऱ्यांनी कामे सुरु केली आहेत. कामे सुरु झालेल्या ९१३ सिंचन विहीरीं पैकी ६१५ शेतकऱ्यांनी या पावसाळयापूर्वी सिंचन विहीरींची कामे पूर्ण केली आहेत या व्दारे गडचिरेाली जिल्हयातील किमान ६१५ एकर क्षेत्राकरीता शेतकऱ्यांना पीकाच्या संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागने किमान ७५ विहीरींचे कामे शेतक-यांकडून जलद गतीने पूर्ण करुन घेण्याचे उददीष्ट़ ठेवले होते त्यानुसार सन २०२१-२२ मधील मंजूर १५० शेतकऱ्यांनी माहे एप्रिल २०२२ – मे २०२२ या कालावधीत सिंचन विहीरींची कामे पूर्ण केली आहेत. तसेच ११३ लाभार्थींना इतर घटकचा जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंपसंच, विज जोडणी आकर, पाईप इत्यादी लाभ देण्यात आला आहे. सिंचन विहीर बाबत माहिती अर्जदार शेतकरी ७१८५ होते. पैकी २२७३ लॉटरीत निवड झालेले शेतकरी आहेत. अटी व शर्तीनुसार १०७७ मंजूरी दिलेले शेतकरी आहेत. मंजूरी नंतर ९१३ कामे सुरु केलेले शेतकरी आहेत. पैकी कामे पुर्ण केलेले शेतकरी ६१५ आहेत. जलद गतीने ७५ दिवसात काम पूर्ण केलेले शेतकरी १५० असून वितरित करण्यात आलेले अनुदान १७.७३ कोटी रूपये आहे.
कामे पूर्ण केलेल्या शेतक-यांना जिल्हा परिषद व राज्य़ शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवड, भाजीपाला लागवड व उन्हाळी भाताची लागवड या करीता प्रवृत्त़ करण्यात येत असुन गडचिरोली जिल्हयातील उमेद अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांची व आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांची मदत घेण्यात येणार आहे. अशी माहिती अप्प़र मुख्य़ कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here