The गडविश्व
देसाईगंज : केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे-२०२२ या धारणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच सद्यस्थितीत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना गतिमान करणे व गतिमान व गुणवत्ता वाढवणे या हेतुने राज्यात महाआवास अभियान – ग्रामीण २०२१-२२ राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील बेघर तथा कच्या घरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाचे पक्या घरात वास्तव्याने स्वप्न पूर्ण व्हावे व यांचे राहणीमान उंचावावे, तसे आपले घर कसे असावे याबाबत लोकांना जागृत करण्याकरिता सुंदर माझे घर या विषयावर जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड येथे शालेय स्तरावर महाआवास अभियान अंतर्गत निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये वर्ग नववी ची विद्यार्थीनी कु. सृष्टी भीमराव रामटेके तर चित्रकला स्पर्धेमध्ये वर्ग आठवी ची विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गिरिधर पिलारे हिने प्रथम स्थान प्राप्त केले.
सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापिका सौ. जे.एच. पराते व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.