The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध विषयांबाबत माहितीचे संकलन करून स्पर्धा परिक्षेकरीता उपयुक्त असे सुमन वेमुला यांनी लिहिलेला पुस्तकाचे विमोचन जिल्हा सांख्यिकीय अधिकारी रमेश पेरगु यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तक मुळ पुस्तकाची चौथी आवृत्ती असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील युवकांनी आठ हजाराहून अधिक पुस्तकांच्या प्रतींची खरेदी केली आहे. जिल्ह्यातील विविध घटकांबाबत या पुस्तकात सविस्तर माहिती असून या माहितीचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. सदर पुस्तक जिल्ह्यातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
विमोचनावेळी जिल्हा सांख्यिकीय अधिकारी यांनी लेखक सुमन वेमुला यांचे विशेष कौतूक केले. ते म्हणाले सिरोंचा मधील दुर्गम भागातून उच्च शिक्षित मुलगा जिल्ह्यातील माहिती सर्वदूर पोहचविण्यासाठी चांगले कार्य केले आहे. जिल्ह्यातील युवकांसह सर्वच स्तरावर या पुस्तकाचे वापर गरजेचा आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमन सारख्याअनेक युवकांमध्ये नवीन काम करण्याची धडपड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या सारखेच इतर मुलांनीही आपली संधी शोधून आपल्या कौशल्यांना वाव द्यावा असे ते म्हणाले. यावेळी सदर पुस्तकाचे लेखक सुमन वेमुला, रमेश निखारे(अन्वेषक), ना.मा.पेदापल्ली (सांख्यिकीय सहायक) तसेच शशिधर कोंडगोर्ला उपस्थित होते.