जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे सिमेंट रोडचे उदघाटन

241

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत आलापल्ली येथे सुरेश गड्डमवार ते पेंदोर यांच्या घरापर्यत सिमेंट कांक्रेट रोडचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेक दिवसांपासून येथील रोडसासाठी नागरिकांनी जि.प.अध्यक्ष यांच्या कडे या मागणी रेटून धरली होती. सदर मागणीस जि.प.अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे उद्घाटन केले.
या उदघाटन सोहळ्याला आलापलीचे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य विजय भाऊ कुसनाके, माजी सरपंच दिलीप गंजीवार, ग्रा.पं.सदस्या रजनि ताई गंजीवार, भाग्यक्षी ताई बेझलवार, माया ताई कोरेत, सुरेश भाऊ गडमवार, महेश गागापुरपु, स्वामी वेलादी, इस्टाम माँडम, आवीसचे कार्यकर्ते चंद्रकांत बेझलवार, जुनेद शेख, शैलेश परसावार, सलीभ भाई, मनोज सडमेक, आदिवासी विद्यार्थी संघाचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here