The गडविश्व
अहेरी : आलापली वेलगूर क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत किष्टापुर वेल येथील मद्दीगुडम येथे मागील अनेक वर्षापासून व्यायामशाळा बांधकामाचे व साहित्याची मागणी युवक वर्गाकडून कडून ज़िल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे करण्यात आली होती. सदर मागणीकडे जि. प. अध्यक्षांनी विशेष लक्ष देऊन मद्दीगुडम गावासाठी ज़िल्हा वार्षिक योजने अंतर्गहत निधी उपलब्ध करून आज सदर कामाचे उदघाटन केले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती गीताताई चालूरकर, ग्रामपंचायत सचिव एन.एच. कापकर, वेलगूर ग्रा. पंचायत सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहुर्ले, पोलीस पाटील बशीर शेख, संतोष वसाके, किशोर नामांनवार, संतोष पोटे, मधुकर सल्लावर, संतोष मोहुर्ले, संपत मच्चावार, समय्या चिंतावर, सुरेश भोयर, सतीश गुरनुले, विलास गुरनुले, बाबुराव जुनघरे,अशोक धानोरकर तसेच सर्व गावकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.