जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

756

– पुणे येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

The गडविश्व
गडचिरोली : राज्यात स्थापन झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन चा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष पुरस्काराने आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना काल ७ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले. काल ७ मार्च रोजी पुणे येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात भारत सरकारचे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विविध विषयांवर सभागृहात सर्वांना सोबत घेवुन केलेले नियोजन व त्याची उकल, केलेली विकासकामे , सामाजिक उपक्रम या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेतांना ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. या संस्थांचे काम अधिक लोकाभिमुख करण्याचे काम या संस्थांचे सदस्य करत असतात. या संस्थांमधील सरपंच, ग्रामसेवक तथा अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याच्या गौरव करणाऱ्या योजना राज्यात राबविल्या जात आहेत. परंतु जि.प. व पं.स. सदस्यांच्या विशेष कामगिरी व योगदानाची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशातच दरवेळी बदलणारे गट व गण आणि आरक्षण यामुळे निवडणुकीपासुनही हे सदस्य वंचित राहतात.या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन, महाराष्ट्रच्या वतीने या लोकप्रतिनिधींच्या प्रभावी आणि दिशादर्शी कामगिरीची नोंद घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी असोसिएशन तर्फे ग्रामविकासाच्या संदर्भातील तज्ञ व राज्य प्रशिक्षक शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत राज्यातील अनेक तज्ञ मंडळींचा समावेश असुन प्राप्त प्रस्तावातील माहिती तपासुन ठरविलेल्या निकषांनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.
या पुरस्कार योजनेत जि.प.,पं.स.कामाचा अनुभव व ज्येष्ठता, विविध प्रशिक्षणातील सहभाग, मतदार संघात केलेले विकासकार्य, बैठकांमधील उपस्थिती, सभागृह कामकाजातील सहभाग व प्रभाव, त्रिस्तरीय पंचायत संस्थांच्या हितासाठी विभाग / राज्य पातळीवरील केलेले कार्य, मतदार संघात राबविलेल्या नाविण्यपूर्ण योजना /विशेष कामगिरी, कामाची वर्तमानपत्र व प्रसार माध्यमांनी घेतलेली नोंद, विविध विभागाच्या योजनांची अंमलबजावणी या निकष व मुद्द्यांवर १०० पैकी गुण देऊन राज्यातील जि.प.अध्यक्ष , सभापती व सदस्य तसेच पं.स.सभापती व सदस्य यांतुन सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधींना सन्मानित केल्या जात आहे.
असोसिएशन तर्फे पूणे येथे काल ७ मार्च रोजी पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
सदर पुरस्कार महाराष्ट्रातून ३६ जिल्ह्यातून अतिमागास व नक्षलग्रस्त ग्रामीण भाग असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या जी;जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अजय कंकडालवार हे आलापली-वेलगुर क्षेत्रातून आदिवासी विद्यार्थी संघ (अपक्ष) म्हणून निवडून आले व जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनले त्यानंतर अडीच वर्षांनी अध्यक्ष बनले व जिल्हाच्या समस्याच्या निराकरण करत अहेरी विधान सभा क्षेत्रात अहेरी, मूलचेरा, भामरागड, एटापली, सिरोंचा या तालुक्यांत आरोग्य, शिक्षण, विज रस्ते यांच्यावर भर देत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करत आहे, विकास कामे करत प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला सहभाग दर्शवित सामाजिक बांधिलकी ठेवत आहेत त्याचेच हे फलित आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधान सभेत जिल्हा परिषदेचे ७ सदस्य, पंचायत समितीचे २८ सदस्य निवडून आणत अहेरी पंचायत समिती मध्ये एक हात्ती सत्ता स्थापन केले तर जास्तीत जास्त ग्राम पंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य जास्त असुन सर्वांच्या सहकार्याने विकास कामे करतांना सोईचे झाले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
या वितरण सोहळ्याला भारत सरकारचे पंचायत राज मंत्री कपिल पाटील व असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.गोरे पाटील व महराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोबत त्यांची अर्धांगीनी सौ.सोनालीताई कंकडालवार, आई श्रीमती मंदाबाई कंकडालवार, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, ऐकमेव कुंदावार, प्रकाश दुर्गे, किरण वेमूला, राकेश आल्लूरवार, राकेश सड़मेक, खरकाटे काका, प्रमोद गोडसेलवार प्रभाकर मडावी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here