The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील आवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या लंकाचेन येथील शिवराम पापया सड़मेक यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आगलागल्याने संपूर्ण घर आगीत जळून राख झाले. यात त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच जि.प. सदस्य अजय नैताम यांना सदर ठिकाणी भेट देवून सड़मेक कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, वट्राचे सरपंच रविंद्र आत्राम, आवलमरीचे उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार, माजी सरपंच मारोती मडावी, ग्राम पंचायत सदस्य वासुदेव सिडाम, आविस कार्यकर्ते व्येँकना कोडापे, प्रकाश दुर्गे, किष्टाया आत्राम, दिपक दुर्गे, शामराव कूळमेथ, तिरुपती सड़मेक, चंद्रु कूळमेथ, शंकर कुमरे आदि उपस्थित होते.
