– करेम,बिड्रि,पैमा रस्त्यांवरील पुलांचे केले भूमिपूजन
The गडविश्व
एटापली : तालुक्यांतील करेम बिड्रि ते पैमा रस्त्यांवरील मोरी व लहान पुल बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 3054/5054 जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सदर विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषद् सदस्या सौ.सारिका आईलवार, आविस सचिव प्रज्वल नागुलवार, पं . स .माजी सदस्य मंगेश हलामी, गुरूपल्ली सरपंच कैलास उसेंडी, ग्रा.पं सदस्य प्रकाश वेलादी, सद्स्य कल्पना तलाडी, पुलिस पाटील अजय गावड़े, देवताड़े, कयूम भाई, चिन्ना वेलादी, पुलिस पाटिल विजय मडावी, वैभव डोनारकर, सुनील संतोश्वर, महेश बिरामवार, श्रीनिवास बिरामवार, राहुल बिरामवार, दिलीप पुपरेड्डीवार, उपविभागीय अभियंता हिरे, कनिष्ट अभियंता आज़म, कांट्रेक्टर अविनाश बोम्मवार सह आविस कार्यकर्ते व पधाधिकारी शेकडो संखेने उपास्थित होते.