– शिक्षक चौधरी यांचा वाढदिवसही साजरा
The गडविश्व
सावली : तालुक्यातील साखरी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा येथे वर्ग ७ वी च्या मुलांचे निरोप समारंभ व तेथील शिक्षक वामन चौधरी यांचा वाढदिवस असा दुहेरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शा.व्य.स. अध्यक्ष महादेव मडावी, जीबगांव केंद्रप्रमुख राजेंद्र रक्षणवार, ग्रा.प.सदस्य रविंद्र गेडाम, शा.व्य.स सदस्य सुरेश झबाडे, अंगणवाडी सेविका निलिमाताई भुरसे, सुनंदाताई चौधरी, दशरथ कुनघाडकर, रुपेश मुळेवार, शा.व्य.स सदस्या संगिताताई कुनघाडकर, मोनिका भूरसे, आशावर्कर रत्नमाला चौधरी, मुख्याध्यापक विजय घोंगे, शिक्षक कामिडवार, वामन चौधरी, ताडाम, व विदयार्थी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्याचे स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर विजय घोंगे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून वामन चौधरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी वर्ग ७ वीच्या मुलांचे मनोगत, डांस कार्यक्रम घेण्यात आले. व मनोगत आणि मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताडाम, प्रास्ताविक मुख्या. घोंगे तर आभार कामिडवार यांनी मानले.