The गडविश्व
गडचिरोली : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जि.प.उच्च प्राथमिक शाळा आंबेशिवणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्याचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व जयघोष करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बांबोळकर यांनी प्रास्तविकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत विद्यार्थ्यांना मोलांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर गीत गायन आणि डांस स्पर्धा घेण्यात येऊन जयभीम नारा देण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष म्हणून हरिदास म्हस्के शा.व्य.स., प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा सरिताताई टेंभुर्णे, उपाध्यक्ष रीनाताई सहारे शा.व्य.स, पोलीस पाटील देवेंद्र भैसारे, शा.व्य.स सदस्य देवराव काळबांधे, राकेश झंजाळ सदस्य, विलास झंजाळ ग्रां.प. सदस्य, धाराताई सोरते आशावर्कर, सुरेश बांबोळकर मुख्याध्यापक,देवाजी बावणे मॅजिक बस जिवन कौशल्य शिक्षक, शेख, सागर आत्राम , गावातील नागरिक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन उज्वला झंजाळ वर्ग ७ वी यांनी केले. प्रास्तविक बांबोळकर आभार शेख यांनी केले.