The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑक्टोबर : जि.प.उ.प्राथमिक शाळा जेप्रा येथे डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कुंदा कांबळे, प्रमुख अतिथी आशिष बांबोळे, समीर भजे, कु आशा हर्षे , मॅजिक बस फॉउंडेशन च्या कु. रीना बांगरे उपस्थित होते.
यावेळी समीर भजे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व वाचन प्रेरणा दिनाचे महत्व समजावून सांगितले तसेच हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा करतात याबद्दल माहिती दिली.
दरम्यान ‘हात धुवा दिन’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे महत्व समजून घेतले. काही विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.