The गडविश्व
अहेरी, २३ जुलै : शहरात तसेच तालुक्यात मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते अशा पुरपीडितांना जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जीवनावश्यक किट्सचे वाटप करून आर्थिक मदत केली.
नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.५ मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कंकडालवार यांनी भेट दिली तसेच पूर पीडीत असलेल्या नागरिकांसोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच पुरामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी ओढवली होती हि बाब अहेरी नगरपंचायत चे उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन यांना माहीती मिळताच माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सांगितले. लगेच कंकडालवार यांनी त्या ठिकाणी असलेल्या पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची किट्सचे वाटप व आर्थिक मदत केली.
यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायत चे अध्यक्ष कु.रोजाताई करपेत, अहेरी न.प.चे बालकल्याण सभापती मीनाताई ओंडरे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार , विलास सिडाम, विलास गलबले, महेश बाकेवार, ज्योतीताई सडमेक, सुरेखा गोडसेलवार, निखत रियाज शेख, हरी श्रीनिवास छाटारे, सलाम शेख, रमेश वते वड्डे, नानाजी लालसू नारोटे, सुखराम सोनू मडावी, कोरके रामा मडावी, सुरेश ऋषी मडावी, मदाना शंकर आत्राम, सोमी सुखराम मडावी, महेश चिंना मडावी, महेश दिवाकर मडावी व इतर नागरीक उपस्थित होते.