– अविस शाखा सिरोंचाच्या वतीने सोमनपल्ली येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
The गडविश्व
सिरोंचा, २८ जुलै : जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आणि मेडिगड्डा धरणातून विसर्ग झालेल्या पाण्यामुळे इंद्रावती व गोदावरी नदीला पूर येऊन सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली गाव पूर्णपणे पाण्याखाली आली असून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालले आहे. गावातील २५० कुटुंब गाव सोडून जवळच असलेल्या हायवेवर झोपड्या बांधून गेल्या एक महिन्यापासून वास्तव्य करत आहेत.
सोमनपल्ली गावातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार आणि अविस अध्यक्ष बानय्या जनगाम व सिरोंचा तालुक्यातील अविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमनपल्ली गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीची माहिती घेऊन पुरामुळे निराधार झालेल्या २५० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
माजी जि.प अध्यक्ष कंकडालवार यांनी प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना भेटून त्यांचेकडून समस्या जाणून घेतल्या व शासनाकडून लवकरत-लवकर मदत मिळवून देऊ असे पुरपीडितांना सांगितले. आम्ही आपल्या सोबत असून वरिष्ठ स्तरावर बोलून सोमनपल्ली गावाचा पुनर्वसनासाठी लढा देऊ असेही कंकडालवार उपस्थित पुरपीडितांना सांगितले.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार, अविस अध्यक्ष बानय्या जनगाम, अविस जेष्ठ नेता शंकर मंदा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी, उपसरपंच सल्ला मॅडम, माजी सभापती भास्कर तलांडी, माजी जिप सदस्य अजय नैताम, सरपंच रमेश तैनेनी, सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच दिलीप गंजीवार, नप सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार, किरण वेमुला, संतोष भिमकरी, अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, सतीश जवाजी, साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे, संजय चिंताकन्नी, सागर कोठारी, समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी, सडवली राजु गूडूरी, दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले, लक्ष्मण गावडे, कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी, महेश तलांडी, संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.