– माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकार व आर्थिक मदत
The गडविश्व
अहेरी, ३१ जुलै : तालुक्यांतील वेलगुर येतील सुरज विठ्ठल मडावी (१९) मुलगा व वडील दुचाकीने बाहेर गावी जावून परत येत असताना समोर येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जबर मार लागले त्यांना लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी सुरज ला मृत घोषीत केले व वडिलांच्या पायाला व डोक्याला दुखापद झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र घरची परिस्थिती हलाखीचे असल्याने अडचण निर्माण झाली होती. सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होऊन मृतक सुरज मडावीचे शवविच्छेदन झाल्यावर वैकुंठरथ बोलावून त्यांला वेलगुर येथे पाठविण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांना पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपक आत्राम यांचेही सहकार्य लाभले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, आविसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले.
