जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सल्लावार परिवाराची सांत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत

593

The गडविश्व
अहेरी ३ जुलै : तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडसेलगुड्डम येथील स्व.रामया मोंडी सल्लावार हे शेतांमध्ये काम करत असताना २३ जून २०२२ ला विज कोसळल्याने मयत झाले होते.
आज कोडसेलगुड्डम येथे सदर परिवाराच्या घरी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून सांत्वन करत आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, सौ.सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे, ग्रा.प.सदस्या कु.इंदूताई पेंदाम, सावित्र चिप्पावार, चौधरी काका, संतोष
सिडाम , गंगाराम सिडाम, वासुदेव सिडाम, उमेश भीमनपलीवार, राकेश सड़मेक आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here