जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन

222

– बोरी येथील जि.प. शाळेला मिळाली नवीन वर्गखोली
The गडविश्व
अहेरी, १६ ऑगस्ट : जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी येथे जिल्हा परिषद शाळेला नवीन वर्गखोली मिळाली असून आज सदर नवीन वर्गखोलीचे उद्घाटन जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.
सदर जि.प.शाळेत इयत्ता १ली ते ४ वी पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेत वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे वर्गखोलीची मागणी केली असता कंकडालवार यांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी मधून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोरी ग्राम पंचायतचे सरपंच शंकर कोडापे, राजपुरप्याच चे सरपंचा सौ.मीनाताई मधुकर वेलादी, राजपुरप्याच च्या उपसरपंचा सौ.सविता कोकरवार, तसेच ग्रापंचयात सदस्या सुमित्रा वासकर, सुरेश गंगाधरीवार, शंकर सिडाम, संतोष पंदीलवार, महेश सडमेक, रामपूर चेक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर छटारे, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार मारोती पल्लीवार, पांडुरंग रामटेके, अशोक वासेकर, मधुकर वेलादी,प्रशांत गोडसेलवार आविस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अहेरी व गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here