– आरती करून महाप्रसादचे केले वाटप
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब भेट देत आरती करून शुभाशीर्वाद घेत महाप्रसादाचे वाटप केले.
यंदा सर्वच सण उत्साहात साजरा करण्यात येत असून नुकत्याच सुरू झालेला गणेशोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कोरोना काळात काही निर्बंध लादण्यात आले होते मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. अहेरी तालुक्यात आलापल्ली येथील आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो. या गणेश मंडळाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब भेट देत आरती करून शुभाआशीर्वाद घेत महाप्रसादाचे वितरण केले.