जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकाळात खेचून आणले कोटींचे विकासकामे

526

– जिल्ह्यात विविध सोयी सुविधा झाल्या उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर  : जिल्ह्यातील जनतेच्या मनामनात व मुखात अजय कंकडालवार हे नाव दडलेले आहे. अजय कंकडालवार यांनी जि.प.उपाध्यक्ष ते जि.प.अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत असतांना या संपूर्ण कार्यकाळात अनेक कोटींचे विकासकामे जिल्ह्याकरिता खेचून आणले. यामुळे जिल्ह्यात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अजय कंकडालवार हे जिल्ह्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले असून अज्जूभाऊ या नावानेही ते परिचित आहे.
अजय कंकडालवार (Ajay Kankadalwar) हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतांना आरोग्य विभागाचा भार त्यांच्याकडे असतांना अनेकवेळा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष भेटी देऊन समस्या जाणून त्या सोडवल्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्वच विभागातील समस्या जाणून सोडवण्याचा तंतोतंत प्रयत्न केला. ५ वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासाकरिता कोटींचे विकासकामे खेचूनही आणले. त्यामुळे जिल्ह्यात आज विविध सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यात अनेक गावामध्ये मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीच्या पाण्याची पातडी कमी होत असते तसेच अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असते. गावातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे तसेच आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी मिळावे याकरिता जल जीवन मिशन अंतर्गत गावात नळ योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक गावातील नागरिकांनी शुद्ध पाणी मिळावे याकरिता गावात जलशुद्धीकरण केंद्र उपलब्ध व्हावे याकरिता मागणी केली होती तसेच गावात मुबलक पाणी मिळावे याकरिता हातपंप उपलब्ध करण्याची मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून १५ व्या वित्त अयोगातून जि.प.माजी अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात जलशुद्धीकरण केंद्र तसेच हातपंप करिता निधी उपलब्ध करून दिला. आज अनेक गावांत जलशुद्धीकरण केंद्र व हातपंप उपलब्ध झाले आहे. याचा नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असून आभार व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करीत अनेकांना मदतीचा हात पुरविला, नुकतीच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यावेळीही पुरपीडितांना कोणतेही पद नसतांना मदतीचा हात पुरविला. जिल्ह्यात आजही अनेक समस्या आवासून उभ्या असून त्या सोडवण्याचे आपले प्रयत्न सुरू राहतील असे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here