– सोबत असलेल्या ३० कार्यकर्त्यांनीही केले रक्तदान
The गडविश्व
अहेरी, ६ जुलै : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा मंगळवार ५ जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व त्यानंतर स्वतः जि. प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रक्तदान केले व त्यांच्या सोबत असलेले नगर पंचायतचे नगराध्यक्ष , उपाध्यक्ष, नगरसेवक व अश्या ३० कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.रोज्या करपेत, उपाध्यक्ष शैलेन्द्र पटवर्धन, स्वि.नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नगरसेविका जोती सडमेक, नगरसेविका निखत रियाज शेख, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, नरेंद्र गरगम, प्रकाश दुर्गे, महेश दहागावकर, दीपक संगमवार, प्रणय गोडसेलवार, प्रमोद गोडसेलवार, शंकर दंडिकवार, विनोद रामटेके, कुमार गुरनुले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तपेठीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. त्यांच्यासोबत इतर ३० कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेत रक्तदानाचा हक्क बजावला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे प्रत्येकांनी एकदा तरी रक्तदान करावे असे आवाहनही माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.