जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली अतिदुर्गम अतिसंवेदनशील चिटवेली गावास भेट

311

– रस्ता नसल्याने मोटर सायकल ने केला खडतर प्रवास
– तलांडी कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत
The गडविश्व
अहेरी, २० सप्टेंबर : तालुक्यातील अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या चिटवेली गावास रस्ता अभावी दुचाकी वाहनाने खडतर प्रवास करून जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली. यावेळी मागील काही दिवसापूर्वी येथील गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी मुत्यू झाला होता. त्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन व आर्थिक मदत केली.
गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावात जाण्यास रस्ते नाहीत. चिटवेली गावात १३ कुटुंब वास्तव्यास राहतात मात्र स्वातंत्र्याचे ७५ वर्ष होऊनही गावाला जाण्यासाठी मुख्य मार्ग नसुन जंगलातुन पायवाटेने प्रवास करावा लागतो. मागील काही दिवसापूर्वी येथील गर्भवती महिला झुरी दिलीप तलांडी (२६) यांचा रस्त्याअभावी मृत्यू झाला. नागरिकांनी अनेकदां शासन प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. गर्भवती महिलेला ट्रॅकटर मध्ये दामरंचा आणत असताना ट्रॅकटर चिखलात फ़सला व त्यानंतर बैलबंडीने आणत असताना वाटेतच तिने प्राण सोडले. सदर घटनेनंतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी गावात भेट देवून माहिती घेतल्याचा सांगितले जात आहे. दरवेळी निवडणुका आले कि लोकप्रतिनिधी येवून मोठमोठे आश्वासन देत असतात मात्र सदर रस्त्याच्या समस्याचे निराकरण करण्यास दुर्लक्ष करत आहेत तरी प्रशासनाकडे मागणी करून रस्त्यांच्या समस्या मार्गी लावून देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडे केली असता सदर समस्या मी आज स्वतः दुचाकी वाहनाने चिखलातून येतांना बगीतली असून अत्यंत खडतर व जीवघेणा प्रवास आहे यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देवून मागणी करण्यात येईल असे सांगितले. तसेच चिटवेली येथील तलांडी कुटुंबाचे सांत्वन करून आर्थिक मदत केली. तसेच येथील नागरिकांसोबत विविध समस्या बाबत सखोल चर्चा केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंच सौ.किरण कोडापे, ग्राम पंचायत सदस्य सम्मा कुरसाम, अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच जिलकरशाह मडावी, प्रमोद कोडापे, भास्कर कोडापे, दिवाकर आलाम, विनोद दूनलावार, पर्वाती वेलादी, गंगाराम गावडे, आशिष सड़मेक, बुंजगराव आलाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here