The गडविश्व
अहेरी, ३१ ऑक्टोबर : तालुक्यांतील आलापल्ली येथे बौद्ध विहार येथे समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तरातून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली होती व निधी प्राप्त होताच प्रथम प्राधान्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे बौद्ध विहार समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष आयु भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष आयु बी एम दूर्गम, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष आयु कार्तिक निमसरकार, ग्रा पं सदस्यां आयुषमती सुमन खोब्रागडे आणि इतरही अनेक उपासक उपासिका व कार्यकर्ते उपस्थित होते.