जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उमानूर येथे विकासकामांचे भूमिपूजन

262

– ग्राम पंचायत अतंर्गत सुध्दागुड्म,जोगनगुडा,सिलमपली येते आवराभिंत, मोरी बांधकाम
The गडविश्व
अहेरी, १ नोव्हेंबर : तालुक्यातील ग्राम पंचायत उमानूर अतंर्गत येत असलेल्या सुध्दागुड्म, जोगनगुडा, सिलमपली येथील शाळेत संरक्षण भिंत व आवश्यक ठिकाणी मोरी बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरल्या असता जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे भूमिपूजन नुकतेच केले.
या भूमिपूजन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेख आलाम, माजी जि.प.सदस्य, अजयभाऊ नैताम, उमानूरचे माजी सरपंचा सौ.ताराबाई आसाम, शामराव गावडे, लक्ष्मीस्वामी अठेला, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, जयराम आत्राम, संदीप आत्राम, नामदेव पेंदाम, नरेंद्र गरगम, दिपक अर्का, इरसाद शेख व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here