– रेंगाबोडी येथे दिली भेट
The गडविश्व
ता.प्र/चिमूर, ३ ऑगस्ट : तालुक्यांतील रेंगाबोडी येथील आपत्तीग्रस्ताला ऑपरेशनकरीता जि.प.माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.
रंगाबोडी येथील रहीवासी प्रेमदास कारमोरे हे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण शेतीच्या माध्यमातून व मोल मजुरी करून करीत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतांना नियतीला ते मात्र मान्य नव्हत नेहमी प्रमाणे हालकीच्या परस्थित कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा उपचार केला. मात्र आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली. पत्नी मोल मजुरी करून संपूर्ण कुटुंब चालवत ही बाब येथील काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जि. प. माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिश वारजुरकर यांना कळवताच डॉ.सतीश वारजूरकर यांनी लगेच कारेमोरे यांच्या घरी भेट देऊन तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.या वेळी चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषण ढोक, विजय पाटील गावंडे, अविनाश अगडे, शहरं अध्यक्ष चिमुर ,नागेंद्र चट्टे उपाध्यक्ष युवक काँग्रेस चिमुर विधानसभा , मंगेश ठोंबरे, सुरेश कारमोरे , मारोती राहाटे व गावकरी उपस्थित होते.