– मोतकुपली,रेगूलवाही परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय
– अहेरी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिती
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील रेगूलवाही ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथील नाल्यावर बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून आदिवासी उप योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून निधी मंजूर करण्यात आले. या बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा मोतकुपली नाल्यावार जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून बंधारा बांधकाम न झाल्याने येथील आदिवासी बांधव व नागरिकांनी मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वतः नाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती व या नाल्यावर बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिली होती.
जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत मोतूकपली येथे बंधारा बांधकामासाठी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. जि.प.अध्यक्षांनी मोतूकपली येथील जनतेला दिलेली ग्वाही तिन महिन्याचा आत पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सदर दोन्ही गावातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे. या बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
बंधारा बांधकाम भूमिपूजन सोहळा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या समवेत ग्राम पंचायत सदस्य श्रीनिवास कोडापे, गीता कोडापे, माजी सरपंच लिंगा वेलादी, भगवान मडावी, गणपती नैताम, सिदु नैताम, रंगा मडावी, सामाजिक एस.जे.डोंगरे, इरसाद शेख, वासुदेव सिडाम व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.