– जि.प. कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मानले आभार
– जिल्हा परिषद स्तरावरील एकुण ८३ व राज्य शासनाचे इतर कार्यालयातील २२७
The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद स्तरावरील एकुण ८३ व राज्य शासनाचे इतर कार्यालयातील २२७ असे एकूण ३१० वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके निकाली काढण्यात आले आहे. याबबाबत जि.प. कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मानले आभार मानले आहे.
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत वैद्यकीय प्रतीपुर्ती देयके विहीत कालावधीत निकाली काढण्यासंबंधाने प्रत्येक महिण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी हे आढावा बैठक घेतात. सदर आढावा बैठकी दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे कार्यालयाकडे प्रतिस्वाक्षरीकरीता वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके पाठविले जातात, प्रतिस्वाक्षरी घेऊन देयक संबंधित कार्यालयास पुन्हा परत केल्या जाते, या प्रक्रियेदरम्यान बराच कालावधी जातो असे लक्षात आपले. हा विलंब टाळण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांनी त्यांचे कार्यालयातील वैद्यकीय प्रतीपुर्ती देयके जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडे प्रतिस्वाक्षरी करीता पाठविण्यात येणाऱ्या प्रारुपामध्ये सदर देयके प्रतिस्वाक्षरी झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाचे खातेप्रमुखांकडे पाठविण्या बाबतचे आदेश निर्गमित केले.
तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे कार्यालयात प्रतिस्वाक्षरी करीता पाठविण्यात आलेले वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके, प्रतिस्वाक्षरी करुन त्वरित जिल्हा परिषद परिषदेला पाठविणे संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक, गडचिरोली यांचेशी समन्वय ठेऊन, वेळोवेळी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधण्यात आला. याचीच फलनिष्पत्ती म्हणुन यापुर्वी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे कार्यालयात जिल्हा परिषदेकडील प्रतिस्वाक्षरीकरीता पाठविण्यात आलेले सर्व वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके प्रतिस्वाक्षरी होऊन मंजुरी करीता संबंधित कार्यालयात पाठविण्यात आलेले होते. तसेच आजच्या स्थितीत प्रतिस्वाक्षरी करीता आलेले वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके जिल्हा शल्य चिकीत्सक, गडचिरोली यांचेकडुन जिल्हा परिषद स्तरावरील एकुण ८३ व राज्य शासनाचे इतर कार्यालयातील २२७ असे एकुण ३१० वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके निकाली निघालेले आहेत. याबद्दल जिल्हा परिषद, गडचिरोलीचे कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आभार मानले आहे.