The गडविश्व
ता. प्र / धानोरा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल येथे आज २३ जुलै रोजी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्राचार्य डी. टी. कोहाडे तर प्रमुख अतिथी पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, ए.बी. कोल्हटकर, वी एम.बुरमवार, देवकाते, शिक्षिका कु.रजनी मडावी, कू.डोके, कोरेवार, सौ.निनावे व बादल वरघंटीवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार कु. रागिणी नरोटे हिने मानले.