The गडविश्व
ता.प्र / धानोरा : स्वातंत्र्याचा अमृतनमहोत्सव निमित्ताने आज जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे पोलीस स्टेशन धानोरा च्या वतीने “महिला सक्षमीकरण” कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे , प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक पोलीस निरीक्षक देढे, विशेष अतिथी पोलीस उपनरीक्ष नाईकवाडे, पोलीस उपनरीक्षक भिसे, पोलीस उपनरीक्षक शिरसाट उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक देढे यांनी मुलांशी संवाद साधत चर्चेच्या माध्यमातून सायबर क्राईम, बालकांचे अधिकार, हुंडाबळी, दारूचे दुष्परिणाम, गुटखाबंदी, पोकसो (pocso) कायदा, आणि स्वातंत्र्याचे ७५ वर्षात झालेले बदल या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले . यानंतर शाळेच्या प्रांगणात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन पी.बी.तोटावार तर आभार पी.वी. साळवे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
