The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशच्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व राजगाटा माल या गावात २८ जुलै ला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाअंतर्गत मुलांना त्यांच्या अध्यापनात सहकार्य मिळावे, मुलांचा शिक्षणात रस कायम राहावा व त्यांना शाळेतील अध्यापन करण्यासाठी मदत मिळावी या हेतूने मॅजिक बस संस्थे तर्फे साहित्याचे वितरण करण्यात आले. त्या शैक्षनीक साहित्यामध्ये बॅग, नोट बुक, चित्रकला वही, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगकांडी बॉक्स, स्केल, रंगीत पेपर बॉक्स, खडू बॉक्स, पेन, ब्लॅक बोर्ड वरील सर्व साहित्याची किट बनवून मुलांना वितरण करण्यात आले.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील १२०० मुलांसाठी “खेळाच्या माध्यमातून विकास ” हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य,गट कार्य,समस्या सोडविणे,शिकण्यातुन शिकणे, स्व-व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण (सी एल सी) द्वारे विज्ञान, गणित, इंग्लिश आदी कार्यक्षेत्रावर काम करीत आहे . सदर कार्यक्रम हा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असून १२ ते १६ वयोगटातील मुलामुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेप्रा च्या सरपंचा सौ. शशिकलाताई झंजाळ, विशेष अतिथी म्हणून बी आर सी.गडचिरोलीचे राजेश पाचारे, बी आर सी.गडचिरोली राजेंद्र बांगरे, माजी सभापती मनोहर पाटील झांजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज भांडेकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा चे मुख्याध्यापक बांबोळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा चे विषय शिक्षक भजे, सौ. हर्षे, किसान विद्यालय जेप्रा चे विषय शिक्षक चापले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य एकनाथ उईके, सदस्य ईश्वर बावणे, सदस्य ईश्वर बोरुले, सदस्या सौ.कोकिळा गेडाम, सौ.ममिता मेश्राम, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा प्रशांत लोखंडे कार्यक्रमाला उपस्थित होते. या दरम्यान मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले व शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिवन कौशल्य शिक्षक लेखाराम हुलके, विषय शिक्षिका रीना बांगरे व समुदाय समन्वयक स्नेहा खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली देवेंद्र हिरापूरे यांच्या सहकार्याने संपन्न झाले.